Thursday 28 May 2020

फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त... मराठी निबंध

                      फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्                                     वाचनाचा मला फार छंद. आठवड्यातून दोनदा तरी ग्रंथालयात फेरी होत   असत. अशाच एका दुपारी हवी असलेली कादंबरी शोधताना कुणीतरी हाक मारल्यासारखे वाटले. वरखाली इकडे तिकडे पाहीले आणि बघते तर काय समोरच्या फळीवर असलेलं पुस्तक चक्क माझ्याशी बोलत होते काय करावं हे मला कळेच ना. आश्चर्यचकित होऊन मी तिथेच उभी होते. पुस्तक मला म्हणाले नमस्कार कसे आहात मी तुम्हाला कित्येकदा या ग्रंथालयात पाहिले आहे तुम्ही तासनतास पुस्तक वाचत असता हे पाहून मला फार आनंद होतो आजच्या युगात खूप कमी लोक इथे येऊन पुस्तक वाचताना दिसतात जास्तीत जास्त मंडळी इथे येऊनही आपल्या मोबाईलमध्ये   डोकावून   बसलेली असतात बघा. अरेच्चा मी पण कसा ना तुम्हाला माझे नावच नाही सांगितले डॉक्टर पेंडसे लिखित एका मारवाड्याची गोष्ट हे माझं माझे वय 11 तुम्हीही कधीतरी मला वाचले पाहिजे खूप लोकांना पुन्हापुन्हा मला वाचून आपल्या डायरीमध्ये काहीतरी नोंद करताना मी बर्‍याचदा पाहिले आहे कालच एक गृहस्थ आपल्या मित्राला  म्हणाले की मला वाचून त्यांना खूप प्रोत्साहन व मनोबल मिळाले आहे. मी संक्षेपात सांगतो माझी कथा... अकरा वर्ष अगोदर वामन काकांनी मला आपल्या मुलीसाठी वाढदिवसाची भेट म्हणून गणेश  पुस्तकालय आतून विकत घेतली त्याच्या मुलीला वाचनाची आवड असल्यामुळे अवघ्या दोन आठवड्यातच तिने माझी कथा वाचली माझी कथा एका मारवाड्याच्या विकासाची व व्यवहार ज्ञानाची आहे.   वाचल्यावर मुलीने मला तिच्या मैत्रिणीला दिले.ज्यांनी-ज्यांनी माझी कथा वाचली त्यांना सर्वांनाच आपल्या आयुष्यातील ध्येय गाठायला नवीन स्फूर्ती नवनव्या कल्पना मिळाल्या आहेत असे मी ऐकले आहे लग्न झाल्यावर मुलीच्या सासरी तिच्या सासूने नवऱ्याने ही माझी कथा वाचली वाचली प्रोत्साहित होऊन त्याने चक्क नवीन व्यवसाय सुरू केला मी जणू काही त्त्याच्यासाठी व्यवसाय करण्याची गुरुकिल्ली ठरलो. दोन वर्ष अगोदर त्या मुलीने मला तिच्या मुलाच्या शाळेच्या ग्रंथालयात देणगी म्हणून दिले. एका बारावीच्या मुलाने मला घरी नेले पण अभ्यासामुळे त्याला मला वाचायला वेळ मिळाला नाही परीक्षा संपल्यावर शाळेच्या पुस्तकात सोबत त्याच्या आईने मलाही या ग्रंथालयात देणगी च्या रूपात देऊन टाकले बघाना जायचं होतं मला शाळेच्या ग्रंथालयात पण आलो मी इथे या भल्यामोठ्या ग्रंथालयात किती पुस्तक  ग्रंथ मासिक आहेत इथे. पुस्तकांची इतकी रूपे मी प्रथमच पाहिली खरच मला इथे फार आवडायला लागलं आहे खूप सुंदर आहे ही इमारत बरर तर तुमचा भरपूर वेळ घेतला ना मी त्याबद्दल क्षमा असावी अशीच नवीन नवीन पुस्तक वाचत जा व आपला ज्ञानकोश वाढवत जा. नमस्कार

No comments:

Post a Comment