Wednesday, 27 May 2020
शेतकऱ्याचे आत्मवृत्त..... मराठी निबंध
शेतकऱ्याचे आत्मवृत्त. उन्हाळ्याची सुट्टी म्हणाल तर मनाला फक्त गावाची ओढ लागते. सर्वत्र पसरलेली हिरवळ, गायांचे हंबरणे, मंदिरातल्या आरत्या, ओसंडून वाहणाऱ्या नद्या. हे सगळं शहरात कुठे ना?? अशाच एका सुट्टीत भेटले मला, शेतकरी सखाराम पाटील , माझ्या मामाच्या शेता पलीकडेच त्यांची अमराई आहे. तुरेदार फेटा, भारदस्त बांधा, रुबाबदार मिश्या व कणखर आवाज असलेले शेतकरी सखाराम पाटील. स्वतः बद्दल बोलताना पाटील म्हणाले" त्याचं असं हाय बघा आमचा जन्मच ह्या मातीतला बरीच जमीन भी हाय आमच्या मालकीची. गहू हाय, बाजरी हाय , आंबा हाय अन भाज्या भी हाईत की. घरातली समधी शेतात घाम गाळत्यात अन मग पिकं डोलायला लागतायत की! शाळा, शाळा शिकलो की पाची पोत होती बघा.. लिहावा वाचाया येतय तवा तर पीक पाण्या संबंधी माहिती कळते.. त्याचं कसं हाय बघा.. काबाड कष्ट करायची तयारी, पिकांची माहिती, अन निसर्गाची साथ हे संमध जुळून आलं की होतय सर्व छान. आता काय रेडिओ , टीव्ही अन तुमचं इंटरनेट हाय ना मंग काय.. मिळती हाय सर्व माहिती अन्न कृषी खात्याची मंडळ येतात अधून मधून माहिती पुरवायला. या बाराला तर पेरणीसाठी ब्या पण पुरवल्या हायत.. गरज पडल्या अवजार खत औषधी पण देतात बघा. पोरं बाळ.. हाय की .. शाळा शिकतात आणि फावल्या वेळात शेतात हात भार लावत्यात. पोरं शिकावीत अनं शेतं डोलावीत देवापाशी हीच प्रार्थना हाय बघा" . असे हे आमचे शेतकरी सकाराम पाटील साधे सरळ व कष्टाळू... आपल्या कृषी प्रधान देशाचे मानं चिन्ह. धन्यवाद
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment