Tuesday, 26 May 2020

मोबाईल शिवाय एक दिवस.. मराठी निबंध

                   मोबाईल शिवाय एक दिवस.                                           सुंदर सकाळ होती ती  बाहेर हलका  हलका पाऊसही पडत होता. अरिजित सिंगच्या गाण्यांचा आनंद घेत आम्ही सर्व गाडीतून चाललो होतो . तेव्हा हो नो!! असे म्हणत दादा ओरडला. ते ऐकताच बाबांनी पटकन ब्रेक मारला. दादा कडे वळून पाहतो तर काय त्याचा चेहरा पांढरा पडला होता. बॅगेत  खिशात सीट खाली तो काहीतरी शोधू लागला. काय झालंय? काय शोधतोय? ह्या प्रश्नांची ची उत्तरे देखील तो देऊ शकत नव्हता , त्याचे तोंड कोरडे पडले होते. पण,  मला कळाले,  मी चटकन म्हणालो,  हा !!दादा आपले आय कार्ड घरीच विसरलाय वाटतं. गेल्याच आठवड्यात की स्थिति अनुभवल्यामुळे दादाची  व्यथा मी समजू शकत होतो. दात-ओठ खात दादा म्हणाला आय कार्ड नाही ही रे मोबाईल राहिलाय घरी. त्यावर अगदी भाबड्या मनाने मी म्हणालो अरेच्या मोबाईलच ना त्यात काय एवढं??? रागाने लालबुंद होऊन दादा म्हणाला त्यात काय तुला कळतंय का माझा मोबाईल राहिलाय  घरी आता मी अख्खा दिवस काय करणार? कसा राहणार? मित्रांसोबत  संपर्क कसा करणार? माझी पोस्ट इन्स्टा स्नॅपचॅट???? असे  काहीतरी काहीतरी तो आता स्वतःशीच बडबडू लागला. काय करणार म्हणजे?  जे कॉलेजात जा , मित्रांना भेट , दंगामस्ती कर आ्णि अभ्यास कर त्यासाठी कशाला हवाय मोबाईल? मीही शाळेत रोज हेच करतो आणि ्आ्णि्आ्णि््आ्णि्आ्ण्आ्््आ्ण्आ्णि््आ्णि्आ्णि््आ्णि्आ्ण्आ्््आ्ण्आ्णि
 तेही मोबाईल शिवाय. दादाची समजूत काढत बाबा म्हणाले अरे दोस्ता राहिलाय मोबाईल आईल तर राहू दे ना व्हाट्सअप वर जोक्स शेअर करण्या पेक्षा आज मित्रांनबरोबर प्रत्यक्षात बसून हस की. आपापल्या मोबाईलवर एकमेकांशी गेम्स खेळण्या पेक्षा समोरासमोर बसून कॅरम बुद्धिबळाचे डाव रंगवा.  मंद हसत आजोबा  ही म्हणाले अरे गड्या एकाच सिटीत सगळ्या मित्रांना गोळा करण्याची  जी मजा आहे ना त्याची सर तुमच्या त्या व्हाट्सअप च्या पिंगला नाही बरं का. आज वाजवून बघ की तुही ही एखादी शेट्टी. दादा आम्हा सर्वांकडे असा बघत होता जणू काही ही आम्ही ही त्याला ऑक्सीजन सिलेंडर शिवाय माउंट एव्हरेस्ट गाठायला सांगत होतो .     कॉलेज येईपर्यंत  एक टक खिडकी बाहेर पाहत बसलेला बिचारा माझा दादा,  गाडी थांबताच वाळवंटात जवळ पाण्याचा एकही थेंब नसलेल्या वाटसरू सारखा चालायला लागला हो. तर असा होता माझ्या आयुष्यातला मोबाईल शिवाय एक दिवस,  माझा नाही ही दादाचा.  धन्यवाद

No comments:

Post a Comment