Wednesday 27 May 2020

पाऊस पडला नाही तर... मराठी निबंध

                        पाऊस पडला नाही तर.                                                पाऊस हा प्रत्येकाचा आवडता मित्र. पाऊस आला की सर्व सृष्टी फुलून उठते,  डोंगर हिरवी चादर पांघरतात,  नद्या ओसंडून वाहतात व ओल्या मातीचा सुगंध मनाला सुखावतो. वातावरण स्वच्छ करणारा व शेतकऱ्याच्या व्याकुळ जीवाला शांत करणारा पाऊस हा  सगळ्यांनाच हवा असतो. पाऊस आहे तर आहेत पिण्यासाठी पाणी आहे व समृद्ध मानवी जीवन आहे. असे असताना पाऊस पडला नाही तर .... या विषयावर विचार करताना देखील मन कासाविस झाले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर ज्या मित्राच्या आगमनाची आपण आतुरतेने वाट पाहतो तो यंदा आलाच नाही  तर? तर काय होईल याची कल्पना करता येतच नाही आहे दरवर्षी न चुकता येणारा सखा जर यंदा आपली  वाट  विसरला तर. आपण काय करणार? ज्या गोष्टीचा विचार जरी केला तरी मनात धास्ती भरते ती गोष्ट जर खरच झाली तर? पाऊस हा आपल्या जीवनातला किती अमूल्य घटक आहे याची खात्री पटते कारण पाऊस नाही तर पिण्याचे पाणी नाही शेती नाही धनधान्य नाही झाड नाहीत शुद्ध हवा नाही पशुपक्षी नाही एकूण आयुष्यच नाही.  पाऊस हा आपल्याला सुख-समृद्धी देतो आणि आपण झाडं कापून,  प्रदूषण पसरवून त्याच्या वाटेत अडथळे निर्माण करतो. आपल्या या मित्राचे आगमन दर वर्षी झालेच पाहिजे याची दक्षता आपणच नको का घ्यायला ? त्यासाठी भरपूर झाडे लावून त्याच्या स्वागताची तयारी सुरू केली पाहिजे.  धन्यवाद

No comments:

Post a Comment