Thursday, 28 May 2020
पक्षी बोलू लागले तर.... मराठी निबंध
पक्षी बोलू लागले तर..... उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आजोबांकडे पुण्याला गेले होते आमचा तिथे मोठा वाडा व वाड्यासमोर छोटेसे अंगण आहे दुपारी अंगणातल्या झाडाखाली निवांत पुस्तक वाचत बसायला मला फार आवडतं एका दुपारी असेच पुस्तकात रमले होते मी तेव्हा ताई थोडे पाणी मिळेल का हे शब्द माझ्या कानावर पडले मला वाटले कोणी वाटसरू उन्हाने त्रासून पाणी मागत आहे पण इकडे तिकडे पाहता कोणीच दिसले नाही मी पुन्हा पुस्तकात रमली थोड्या वेळाने पुन्हा तेच शब्द कानी पडले निरखून पाहिले तर गवतात एक चिमणी माझ्याकडे पाहत होती मला फार तहान लागली आहे हे शब्द ऐकताच मी स्तब्ध झाले पण पुढे काही विचार करण्या अगोदरच चिमणी ताई माझ्याशी बोलू लागली यंदा उन्हाळा फारच खडक आहे ना मी तुमच्या अंगणात रोज येते. . या चाफ्याच्या झाडाखाली छान सावली असते आजची आज घरी नाहीत का? त्या रोज आम्हा पक्षांसाठी तांदूळ व वाटीभर पाणी आठवणी ठेवतात मी शेजारच्या बागेत ते आंब्याचे झाड आहे ना तेथे राहते यावर्षी पाऊस जितका जास्त झाला आहे ऊनही तिचेच खडक पडत आहे आम्हाला पक्षांची दोनच कामे असतात पिल्लांसाठी जेवण शोधणे व मोठ्या पक्षांपासून साप कुत्री व मांजर पासून पिल्लांचे व स्वताचे रक्षण करणे प्रत्येक दिवस संघर्षणा चा असतो पण एक सांगू पिंजरा राहण्यापेक्षा हे माझे जीवन मला आवडते पिंजऱ्यात नियमित पोटभर जेवण व सुरक्षा जरी असली तरी मनासारखे वागण्याची स्वतंत्रता नाहीना आकाशात उंच भरारी नाही पावसात मनसोक्त भिजणे नाही पिल्लांचा सहवास नाही ह्या सगळ्यातून मिळणारा आनंदच तर आमच्या जीवनात असलेल्या धोक्यांना हसत हसत सामोरे जायची शक्ती देतो माझ्यासाठी माझे स्वातंत्र्य अतिशय मोलाचे आहे ताई जरा पाणी द्या ना माझी पिल्लं माझी वाट पाहत असतील चिमणीच्या या संवादाने मी दंग झाले ती उडून गेल्या नंतरही बराच वेळ तिच्या बोलण्याचा विचार केला तर त्या इवल्याश्या पक्षासाठी मनात नवीन आदर निर्माण झाला स्वतंत्रतेच्या तुलनेत जगातील सर्व सुखसोईंची किंमत शुल्लकच ठरते धन्यवाद
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment